नुकतेच लक्षद्वीपमध्ये उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘मिशन रंगीन माछली (Mission Rangeen Machhli) २०३१’ या धोरणात्मक कृती आराखड्याचे प्रकाशन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • लक्षद्वीपमधील अगात्ती येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  • मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या (Ministry of Fisheries, Animal Husbandry and Dairying - MoFAHD) मत्स्यव्यवसाय विभागातर्फे आयोजित केलेल्या या 'मत्स्यव्यवसाय संपर्क कार्यक्रमादरम्यान भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी ‘मिशन रंगीन माछली २०३१’  हा शोभेच्या माशांच्या मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठीचा धोरणात्मक कृती आराखडा प्रकाशित केला.
  • केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग, केंद्रीय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंग बघेल आणि इतर मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
  • ‘मिशन रंगीन माछली २०३१’ हा उपक्रम वैज्ञानिक व्यवस्थापन, जैवसुरक्षा उपाय, गुणवत्ता हमी तसेच नियामक अनुपालन यांद्वारे शोभेच्या माशांच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या संघटित वाढीसाठी एकसमान आराखडा प्रदान करतो.