नुकतेच व्ही.ओ. चिदंबरनार बंदर हे ऊर्जा व्यवस्थापनासाठी ISO ५००००:२०१८ प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले बंदर ठरले आहे.

ठळक मुद्दे:

  • हे बंदर तामिळनाडूमधील थुथुकुडी येथे स्थित आहे.
  • सदर बंदराला 'ब्युरो वेरिटास' (Bureau Veritas) द्वारे 'स्कोप-२ उत्सर्जन-मुक्त बंदर' (Scope-2 Emission-Free Port) म्हणूनही मान्यता देण्यात आली; कारण आर्थिक वर्ष २०२६ मध्ये बंदराच्या एकूण वीज गरजेपैकी ९३.८९% गरज अक्षय ऊर्जा स्रोतांद्वारे पूर्ण करण्यात आली होती.

ISO ५००००:२०१८ प्रमाणपत्राबद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • हे प्रमाणपत्र म्हणजे ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली स्थापित करणे, त्याची अंमलबजावणी करणे, ती टिकवून ठेवणे आणि त्यात सतत सुधारणा करणे यासाठीचे हे एक आंतरराष्ट्रीय मानक आहे.
  • जेव्हा एखाद्या विशिष्ट कालावधीत बंदराची अक्षय ऊर्जा निर्मिती ही त्याच्या एकूण वीज वापरापेक्षा जास्त असते, तेव्हा ते बंदर 'शून्य स्कोप-२ उत्सर्जन' (zero Scope-2 emissions) साध्य करू शकते.

ISO बद्दल थोडक्यात:

  • पूर्ण नाव (Full-form): ISO म्हणजेच 'International Organization for Standardization' अर्थात 'आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्था' होय.
  • स्थापना वर्ष: १९४७ मध्ये ISO ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे ISO चे मुख्यालय स्थित आहे. 
  • मुख्य कार्य: गुणवत्ता, पर्यावरण, ऊर्जा व्यवस्थापन, सुरक्षा आणि औद्योगिक प्रक्रिया यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय मानके विकसित करणे हे ISO चे मुख्य कार्य आहे.