पशुसंवर्धनाची मूलभूत आकडेवारी अर्थात 'बेसिक ॲनिमल हसबंड्री स्टॅटिस्टिक्स (Basic Animal Husbandry Statistics - BAHS)' २०२५ नुसार, २०२४-२५ मध्ये उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य बनले आहे.

ठळक मुद्दे:

  • नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार, उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य बनले असून २०२४-२५ या कालावधीमध्ये देशाच्या एकूण दूध उत्पादनात या राज्याचा वाटा १५.६६% इतका होता.
  • पशुसंवर्धनाची मूलभूत आकडेवारी अर्थात 'बेसिक ॲनिमल हसबंड्री स्टॅटिस्टिक्स (Basic Animal Husbandry Statistics - BAHS)' २०२५ नुसार, २०२४-२५ मध्ये भारताच्या एकूण दूध उत्पादनात उत्तर प्रदेश १५.६६% इतक्या टक्केवारीसह पहिल्या तर राजस्थान १४.८२% इतक्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर विराजमान झाले आहेत.
  • २०२४-२५ मध्ये उत्तर प्रदेशने अंदाजे १९.०१ दशलक्ष टन दुधाचे उत्पादन केले आहे.

भारतातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारी शीर्ष ५ राज्ये (कालावधी: २०२४-२५)

  • सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्या या पाच राज्यांचा वाटा भारताच्या एकूण दूध उत्पादनाच्या निम्म्याहून अधिक आहे.

भारतातील दूध उत्पादनानुसार राज्यांचा क्रम आणि टक्केवारी:

  • १. उत्तर प्रदेश (१५.६६%)
  • २. राजस्थान (१४.८२%)
  • ३. मध्य प्रदेश (९.१२%)
  • ४. गुजरात (७.७८%)
  • ५. महाराष्ट्र (६.७१%)