नुकतेच केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी 'भारतीय व्यवस्थापन संस्था अहमदाबाद (Indian Institute of Management Ahmedabad - IIMA) हेल्थकेअर समिट २०२६' मध्ये आरोग्यसेवेतील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence - AI) प्रगतीबाबत मार्गदर्शन केले आहे.

ठळक मुद्दे:

  • आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health & Family Welfare - MoHFW) तसेच रसायने आणि खते मंत्रालयाच्या (Ministry of Chemicals & Fertilizers - MoCF) केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी अहमदाबाद ,गुजरात येथे आयोजित 'भारतीय व्यवस्थापन संस्था अहमदाबाद (Indian Institute of Management Ahmedabad - IIMA) हेल्थकेअर समिट २०२६' ला संबोधित केले.
  • 'आरोग्यसेवेतील कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रगती (Advancing AI in Healthcare)' हा सदर परिषदेचा विषय होता.
  • संशोधन, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आरोग्यसेवेच्या माध्यमातून भारताचे रूपांतर 'जगाची फार्मसी' (औषध केंद्र) ते 'जगाची प्रयोगशाळा' (Laboratory of the World) या रूपात करण्यावर या परिषदेत भर देण्यात आला.
  • या परिषदेत 'इंडिया फार्मा आर्काइव्हज' (India Pharma Archives) या डिजिटल उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.