केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यामार्फत गांधीनगरमधील ग्रंथालयांना जोडण्यासाठी 'ग्रामीण ज्ञान सेतू (Gramin Gyan Setu)' ॲपचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • अमित शाह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'ग्रामीण ज्ञान सेतू' ॲपचे अनावरण केले.
  • गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील ग्रंथालयांना एकमेकांशी जोडणे हा सदर उपक्रमाचा  मुख्य उद्देश आहे.
  • या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे गावातील मुलांना पुस्तकांचा एक मोठा संग्रह उपलब्ध होईल ज्यामुळे ग्रामीण भागात वाचन संस्कृती, अध्ययन आणि ज्ञानाची उपलब्धता यांना चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
  • 'राष्ट्रीय ग्रंथालय दिन' म्हणून साजरा केला जाणारा १२ ऑगस्ट हा दिवस जो पद्मश्री एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिवस या ॲपच्या उद्घाटनासाठी निवडण्यात आला होता.