केंद्रीय मंत्री श्री. अमित शाह यांच्या हस्ते नुकतेच मुंबईमध्ये 'राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या (National Urban Cooperative Finance and Development Corporation - NUCFDC)' नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री श्री. अमित शाह यांच्या हस्ते मुंबईतील फोर्ट परिसरातील 'शारदा सदन' येथे NUCFDC च्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
- 'सहकार नव-क्रांती' या कार्यक्रमादरम्यान हे उद्घाटन संपन्न झाले.
- तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि बँकिंग पायाभूत सुविधांच्या माध्यमातून शहरी सहकारी बँका बळकट करण्यावर आणि त्यांचे आधुनिकीकरण करण्यावर हा कार्यक्रम मुख्यत्वे केंद्रित होता.
- सदर कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतील 'BSE आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्रामध्ये (BSE International Convention Centre)' आयोजित करण्यात आला होता.