केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नुकताच गुजरातच्या अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकावरून भारताच्या पहिल्या लिक्विफाइड नॅचरल गॅसवर (Liquefied Natural Gas - LNG) चालणाऱ्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला आहे.
ठळक मुद्दे:
- सदर कार्यक्रमादरम्यान त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या उपस्थितीत १,४७२ कोटी रुपये खर्चाच्या रेल्वे विकास प्रकल्पांचे तसेक ७०० कोटी रुपये खर्चाच्या WAG-12 लोकोमोटिव्ह इंजिन देखभाल शेडचे उद्घाटनही केले.
- ही रेल्वेगाडी डिझेल आणि LNG या दोन्ही इंधनांचा वापर करणारी 'डिझेल-एलएनजी ड्युअल-फ्यूल डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (Diesel-LNG dual-fuel Diesel Electric Multiple Unit - DEMU)' म्हणून चालते.
- या तंत्रज्ञानामुळे डिझेलचा वापर ४० टक्क्यांपर्यंत कमी होण्यास आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यास मदत होते.