केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते नुकतेच नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 'आरोग्य मंथन २०२६' चे उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश (जे.पी.) नड्डा यांनी 'आरोग्य मंथन २०२६' चे उद्घाटन केले आहे.
- 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' ची ८ वर्षे तसेच 'आयुष्मान भारत डिजिटल मिशन' ची ५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त याचे आयोजन करण्यात आले आहे.
- सदर कार्यक्रमाचे आयोजन 'नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीमार्फत (National Health Authority - NHA)' करण्यात आले होते.
- भारताची डिजिटल आरोग्य तसेच आरोग्य हमीविषयक पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम या कार्यक्रमात सुरू करण्यात आले आहेत.