नुकतीच 'युनायटेड स्टेट्स-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम (United States-India Strategic Partnership Forum - USISPF)' जागतिक मंडळामार्फत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (National Human Rights Commission - NHRC) माजी सरचिटणीस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भरत लाल यांची वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- ते भारतात संशोधन, शिक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच रोजगाराच्या संधींना चालना देण्यासाठी USISPF च्या एका जागतिक उपक्रमाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहतील.
भरत लाल यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:
- ते १९८८ च्या बॅचचे भारतीय वन सेवा (Indian Forest Service - IFoS) गुजरात केडरचे अधिकारी आहेत.
- सार्वजनिक प्रशासन, शासन व्यवस्था तसेच संस्था उभारणी क्षेत्रात त्यांना सुमारे ४ दशकांचा अनुभव आहे.
भूषविलेली पदे:
- महासंचालक - नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स
- सचिव - भारताच्या लोकपाल कार्यालय
- अतिरिक्त सचिव - भारताच्या राष्ट्रपती
- संस्थापक 'मिशन डायरेक्टर' - जल जीवन मिशन