नुकताच अमेरिकेचे रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वूडफोर्ड यांनी समष्टि-आर्थिक स्थिरीकरण (Macroeconomic Stabilisation) क्षेत्रातील प्रगतीसाठी २०२६ चा 'स्वेरिजेस रिक्सबँक प्राईज इन इकॉनॉमिक सायन्सेस (Sveriges Riksbank Prize in Economic Sciences)' अर्थात अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जिंकला आहे.

ठळक मुद्दे:

  • 'रॉयल ​​स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस'मार्फत अमेरिकन अर्थतज्ज्ञ रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वूडफोर्ड यांना त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल 'अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अर्थशास्त्रातील स्वेरिजेस रिक्सबँक पुरस्कार' जो 'अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार' म्हणूनही ओळखला जातो तो प्रदान करण्यात आला आहे.
  • या दोन्ही विजेत्यांना  १ कोटी २० लाख स्वीडिश क्रोनर इतकी पुरस्काराची रक्कम विभागून देण्यात आली आहे.
  • दरवर्षीप्रमाणे सदर पुरस्कार अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त १० डिसेंबर रोजी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे प्रदान करण्यात येतो.

विजेत्यांबाबत महत्वपूर्ण माहिती:

रॉबर्ट ई. हॉल:

  • १९४३ मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील पालो अल्टो येथे त्यांचा जन्म झाला होता.
  • मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधून त्यांनी १९६७ मध्ये पीएचडी (PhD) पदवी प्राप्त केली होती.
  • सध्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातते  प्राध्यापक आणि 'हूवर इन्स्टिट्यूशन'मध्ये वरिष्ठ फेलो म्हणून कार्यरत आहेत.

मायकेल वूडफोर्ड:

  • १९५५ मध्ये अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स राज्यातील चिकोपी येथे यांचा जन्म झाला.
  • १९८३ मध्ये MIT मधून त्यांनी पीएचडी पदवी मिळवली होती.
  • ते सध्या न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.