'यूएस ओपन (US Open)' २०२६ मध्ये एलेना रायबाकिना हिने नुकतेच महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

ठळक मुद्दे:

  • अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात टेनिसमधील 'यूएस ओपन (US Open)'ची १४६ वी आवृत्ती असलेली 'यूएस ओपन २०२६' स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
  • कझाकस्तानच्या एलेना रायबाकिना हिने २ वेळा गतविजेती राहिलेल्या आर्यना सबालेन्काचा महिलांच्या अंतिम सामन्यात ६-४, ५-७, ६-२ असा पराभव करून यूएस ओपनचे एकेरी विजेतेपद जिंकले आहे.
  • रायबाकिना हिने हे विजेतेपद पटकविताना सबालेन्काची यूएस ओपनमधील सलग १९ सामन्यांची विजयी घोडदौड खंडित केली.
  • स्वतःचे तिसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवत रायबाकिना हिने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.