नुकत्याच पार पडलेल्या U20 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत (World Championships) मानसी लाथेरने रौप्यपदकावर तर तन्वी आणि कोमल यांनी कांस्यपदकांवर मोहोर उमटवली आहे.
ठळक मुद्दे:
- U20 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मानसी लाथेर, तन्वी मगदूम आणि कोमल या भारतीय महिला कुस्तीपटूंनी ३ पदके जिंकली आहेत.
- या महिला कुस्तीपटूंनी स्लोव्हाकिया येथे सुरू असलेल्या U20 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पदकांच्या यादीत आणखी ३ पदकांची भर घातली.
- अंतिम फेरीत केलेल्या कामगिरीच्या जोरावर मानसी लाथेरने ६८ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले.
- तन्वी मगदूम हिने महिलांच्या ५७ किलो वजनी गटात कॅनडाच्या ॲग्निया क्राकोव्हस्काचा १०-४ असा पराभव करून तर कोमलने ५९ किलो वजनी गटात हंगेरीच्या एडा बालाझचा ५-२ असा पराभव करून स्पर्धेत २ कांस्यपदके मिळवली.
- याआधी काजल ढोचकने सुवर्णपदक तर तनु शर्मा व सविता यांनी २ रौप्यपदके जिंकलेली आहेत.
भारताच्या नवीन पदक विजेत्यांवर एक कटाक्ष:
- मानसी लाथेर (६८ किलो) – रौप्यपदक
- तन्वी मगदूम (५७ किलो) – कांस्यपदक
- कोमल (५९ किलो) – कांस्यपदक