नुकतेच २ वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेत्या आणि जॅझ गायिका कॅसँड्रा विल्सन यांचे निधन झाले आहे.

ठळक मुद्दे:

  • अमेरिकेतील जॅक्सन, मिसिसिपी येथे कॅसँड्रा विल्सन यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले आहे.
  • जॅक्सन, मिसिसिपी, अमेरिका येथे त्यांचा जन्म ४ डिसेंबर १९५५ रोजी झाला होता.

कॅसँड्रा विल्सन यांच्याबद्दल महत्वाची माहिती:

  • वयाच्या ६ व्या वर्षी त्यांनी पियानो शिकण्यास सुरुवात केली होती.
  • नंतर क्लॅरिनेट वाद्य वाजवण्यात रस घेऊन त्यामध्ये त्यांनी हातखंडा मिळविला होता.
  • मिल्सॅप्स कॉलेज आणि जॅक्सन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी शिक्षण घेतले होते.
  • न्यू ऑर्लिन्समध्ये प्रशिक्षण घेऊन त्या पुढे न्यूयॉर्क येथील स्टीव्ह कोलमॅन यांच्या 'एम-बेस कलेक्टिव्ह (M-Base Collective)' मध्ये सामील झाल्या होत्या.
  • १९८६ मध्ये 'पॉइंट ऑफ व्ह्यू (Point of View)' हा आपला पहिला अल्बम त्यांनी प्रदर्शित केला होता. 
  • त्यानंतर आपल्या १९९० मधल्या 'जंपवर्ल्ड (Jumpworld)' आणि १९९१ मधल्या 'शी हू वीप्स (She Who Weeps)' या अल्बम्सद्वारे जॅझ शैलींचे विविध पैलू त्यांनी हाताळले होते.

प्रमुख प्रसिद्ध अल्बम आणि वर्ष:

  • 'न्यू मून डॉटर (New Moon Daughter)' - १९९६
  • 'लव्हरली (Loverly)' - २००८
  • 'कमिंग फोर्थ बाय डे (Coming Forth by Day)' - २०१५

प्राप्त पुरस्कार: 

  • २ ग्रॅमी पुरस्कार (१९९७, २००९) आणि ४ वेळा ग्रॅमी नामांकने
  • २००१ मध्ये 'अमेरिकेची सर्वोत्तम गायिका' (America’s Best Singer) म्हणून गौरव
  • २०२२ मध्ये 'नॅशनल एंडोमेंट फॉर द आर्ट्स' (NEA) द्वारे 'जॅझ मास्टर' म्हणून मान्यता