कर्नाटक सरकारमार्फत नुकतीच उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यांसाठी तुलू भाषेला राज्याची 'दुसरी अतिरिक्त प्रशासकीय भाषा' म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- या घोषनेसोबतच सरकारने नवीन पर्यटन तसेच सागरी धोरणांनाही मंजुरी दिली आहे.
- राज्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंगळुरू येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या निर्णयाची घोषणा केली.
- किनारपट्टी आणि मलनड भागांसाठी नवीन पर्यटन धोरणालाही पर्यटन क्षेत्रातील पायाभूत सुविधांना चालना देणे तसेच गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.