३ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते बंगाली चित्रपट निर्माते 'राजा सेन' यांचे नुकतेच वयाच्या ७१ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे:

  • पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे ज्येष्ठ बंगाली चित्रपट निर्माते राजा सेन यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले आहे.
  • चित्रपट, दूरदर्शन तसेच माहितीपट निर्मिती क्षेत्रातील योगदानासाठी सेन हे सुप्रसिद्ध होते.
  • पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे १० नोव्हेंबर १९५५ रोजी त्यांचा जन्म झाला होता.

राजा सेन यांच्याबद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • माहितीपट निर्मितीने राजा सेन यांनी खरंतर आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती मात्र १९९६ सालच्या 'दमु' या चित्रपटाद्वारे त्यांची खरी मोठी ओळख निर्माण झाली.
  • 'सुचित्रा मित्रा' साठी 'सर्वोत्कृष्ट कला/सांस्कृतिक चित्रपट (१९९३)', 'दमु'साठी 'सर्वोत्कृष्ट बालचित्रपट (१९९७)' तसेच 'आत्मीय स्वजन' साठी 'कुटुंब कल्याण विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट (१९९९)' असे आपल्या कला कारकिर्दीत त्यांनी ३ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले होते.
  • त्यांनी अनेक दिग्गज सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वांवर माहितीपटही तयार केले होते.
  • चित्रपट, दूरदर्शन आणि माहितीपटांच्या माध्यमातून राजा सेन यांनी बंगाली साहित्य, संस्कृती आणि सामाजिक विषयांचे जतन केले आहे.
  • भारतीय प्रादेशिक चित्रपटसृष्टीवर त्यांच्या या कार्याचा कायमस्वरूपी प्रभाव पडला आहे यात शंकाच नाही.