नुकतेच आशियाई पॅरा गेम्समध्ये तीन वेळा सुवर्णपदक विजेते नीरज यादव यांचे दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे:

  • ४२ वर्षीय भारतीय पॅरालिम्पिक खेळाडू, भालाफेकपटू आणि आशियाई पॅरा गेम्समध्ये तीन वेळा सुवर्णपदक विजेते नीरज यादव यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले आहे.
  • १० फेब्रुवारी १९८४ रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे त्यांचा जन्म झाला होता.

नीरज यादव यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • मज्जासंस्थेच्या नुकसानीमुळे त्यांना वयाच्या सातव्या वर्षी पोलिओनंतरचा अर्धांगवायू झाला होता परंतु तरीही त्यांनी व्यावसायिक क्रीडा कारकीर्द घडवण्याचा दृढ निश्चय कायम ठेवला होता.
  • २००५ ते २०१२ या काळात 'व्हीलचेअर टेनिस'मध्ये त्यांनी भाग घेतला होता.
  • २०१३ ते २०१५ च्या सुमारास त्यांनी 'पॅरा-ॲथलेटिक्स'मधील 'F55' श्रेणीत (बसून केल्या जाणाऱ्या क्रीडा प्रकारांत) प्रवेश केला होता.

प्राप्त पदके:(३ सुवर्णपदके)

  • १. पुरुषांच्या भालाफेक (F55) प्रकार (२९.८४ मीटर अंतर), जकार्ता गेम्स- २०१८
  • २. पुरुषांच्या डिस्कस थ्रो, हांगझोऊ आशियाई पॅरा गेम्स - २०२३
  • ३. पुरुष भालाफेक (F55) प्रकार - २०२३