नुकतेच महाराष्ट्रातील लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन या ३ समुद्रकिनाऱ्यांना २०२६-२७ या कालावधीसाठी 'आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग (International Blue Flag)' प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर आणि गुहागर, तसेच रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या समुद्रकिनाऱ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
- राज्यातील समुद्रकिनाऱ्यांना मिळालेली ही पहिलीच वेळ आहे.
'ब्लू फ्लॅग' प्रमाणपत्राबाबत महत्वपूर्ण माहिती:
- 'ब्लू फ्लॅग' हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असे 'पर्यावरण-चिन्ह' आहे.
- सदर प्रमाणपत्र अशा समुद्रकिनाऱ्यांना नौकाविहार केंद्रे तसेच शाश्वत बोटिंग पर्यटन चालकांना दिले जाते जे निर्धारित पर्यावरणीय आणि सुरक्षा मानकांची पूर्तता करतात.
- जर एखाद्या समुद्रकिनाऱ्याला 'ब्लू फ्लॅग' पुरस्कार मिळाला की तो १ वर्षासाठी किंवा एका हंगामासाठी वैध असतो तसेच त्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते.
- सदर प्रमाणपत्र हे पर्यावरण शिक्षण आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्याचे काम करणाऱ्या डेन्मार्कस्थित 'फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन (Foundation for Environmental Education - FEE)' द्वारे दिले जाते.