नुकतीच झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष टावेंग्वा मुखुहलानी यांची नोव्हेंबर २०२७ पर्यंत 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (International Cricket Council - ICC)' उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- इम्रान ख्वाजा यांच्या निवृत्तीनंतर ICC बोर्डामध्ये ही जागा रिक्त झाली होती ज्यावर आता मुखुहलानी यांची निवड करण्यात आली आहे.
- ही निवड नोव्हेंबर २०२७ पर्यंत करण्यात आली आहे.
- 'आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२७' च्या पार्श्वभूमीवर सदर नियुक्ती करण्यात आली आहे.
- झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि नामिबिया हे देश संयुक्तपणे या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहेत.
- या नवनियुक्तीमुळे मुखुहलानी हे ICC चे उपाध्यक्षपद भूषवणारे झिम्बाब्वेचे पहिलेच व्यक्ती ठरले आहेत.
टावेंग्वा मुखुहलानी यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:
- झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष असणारे मुखुहलानी हे ICC बोर्डात या संस्थेचे प्रतिनिधित्व करतात.
- त्यांनी ICC च्या विविध समित्यांमध्ये अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत.
- ते सध्या 'वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समिती' आणि 'नामांकन समिती'चे सदस्य असून 'मानव संसाधन आणि मानधन समिती'चे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.
ICC बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): ICC म्हणजेच 'International Cricket Council' अर्थात 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद' होय.
- स्थापना वर्ष: १५ जून १९०९ रोजी लंडन येथे ICC ची स्थापना करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: २००५ पासून दुबई, संयुक्त अरब अमिराती (पूर्वी १९०९ ते २००५ दरम्यान लंडन) येथे ICC चे मुख्यालय स्थित आहे.
- सदस्य देश: सध्या ICC चे १११ सदस्य देश आहेत.
- सध्या कार्यरत अध्यक्ष: सध्या जय शाह हे ICC च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.