स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाला (Clean Energy Technologies) चालना देण्यासाठी नुकताच टाटा पॉवर (Tata Power) आणि आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) यांच्यात मुख्य संशोधन करार (Master Research Agreement - MRA) संपन्न झाला आहे.

ठळक मुद्दे:

  • मुख्यत्वे पुढील पिढीतील ऊर्जा तंत्रज्ञान आणि स्वच्छ ऊर्जा उपाययोजनांचा विकास, विस्तार व व्यापारीकरण यांना गती देण्यासाठी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड (Tata Power Company Limited) आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (Indian Institute of Technology) मुंबई यांच्यामध्ये नुकताच मुख्य संशोधन करार संपन्न झाला आहे.
  • टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीर सिन्हा आणि IIT बॉम्बेचे संशोधन आणि विकास अधिष्ठाता प्रा. श्रीकृष्ण व्ही. कुलकर्णी यांनी मुंबईतील IIT मुंबईच्या आवारात सदर करारावर स्वाक्षरी केली.
  • उद्योगांसाठी उपयुक्त आणि मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्यायोग्य ऊर्जा तंत्रज्ञान विकसित करणे, भारताच्या स्वच्छ ऊर्जेकडे होणाऱ्या स्थित्यंतराला गती देणे तसेच ऊर्जा सुरक्षा व शाश्वत विकास बळकट करणे ही उद्दिष्टे सदर करारांतर्गत निश्चित करण्यात आली आहेत.

टाटा पॉवरबद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • स्थापना वर्ष: १९१९ मध्ये टाटा पॉवरची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे टाटा पॉवरचे मुख्यालय स्थित आहे.
  • वैशिष्ट्य: भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक ऊर्जा कंपन्यांपैकी ही एक कंपनी असून ती सध्या पारंपरिक आणि नवीकरणीय अशा दोन्ही ऊर्जा क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.