तमिळनाडूमार्फत नुकतेच 'अन्नपूर्णी सुपर सिक्स एलपीजी योजनेचे (Annapoorani Super Six LPG Scheme)' अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • जानेवारी २०२७ पासून सदर योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना घरगुती एलपीजी सिलिंडरच्या खर्चाची प्रतिपूर्ती 'थेट लाभ हस्तांतरणद्वारे (Direct Benefit Transfer - DBT)' करण्यात येणार आहे.
  • ही एक कल्याणकारी योजना असून पात्र कुटुंबांसाठी घरगुती एलपीजी वापराचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने या नवीन योजनेचे अनावरण करण्यात आले आहे.
  •  २४ ऑगस्ट २०२६ रोजी राज्य विधानसभेत ही नवीन योजना सादर करण्यात आली होती. तिची अंमलबजावणी जानेवारी २०२७ मध्ये सुरू होईल.
  • सदर योजनेनुसार लाभार्थ्यांना घरगुती एलपीजी सिलिंडर खरेदीसाठी आलेल्या खर्चाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात परत मिळेल अशी सुविधा आहे.

समाविष्ट लाभार्थी घटक:

  • वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसणारी ज्या कुटुंबे
  • मध्यम शेतकरी
  • अल्पभूधारक शेतकरी
  • दिव्यांग व्यक्ती