TVS Motor मार्फत नुकतीच पेमन कारगार यांची नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer - CEO) आणि संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • सदर नियुक्ती ही २७ जानेवारी २०२७ पासून अंमलात येईल.
  • पेमन कारगार हे के.एन. राधाकृष्णन यांची जागा घेतील.
  • जुलै २०२७ मध्ये होणाऱ्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत के.एन. राधाकृष्णन हे अकार्यकारी संचालक (non-executive director) म्हणून काम पाहतील.

पेमन कारगार यांच्याबद्दल थोडक्यात महत्वाची माहिती:

  • कारगार यांना जागतिक ऑटोमोटिव्ह क्षेत्रात - युरोप, आशिया, आफ्रिका आणि मध्य पूर्व या प्रदेशांमधील अभियांत्रिकी, उत्पादन, प्रकल्प व्यवस्थापन, गुणवत्ता, विक्री, विपणन आणि व्यवसाय विकास यामध्ये ३० वर्षांहून अधिक काळाचा व्यापक अनुभव आहे.
  • ते सध्या TVS Motor मध्ये आंतरराष्ट्रीय व्यवसाय प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
  • त्यांनी यापूर्वी निसानच्या (Nissan) 'इन्फिनिटी मोटर कंपनी(INFINITI Motor Company)' या वाहन विभागात जागतिक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून २ वर्षे काम केले आहे.
  • त्यांनी रेनॉल्ट ग्रुपमध्ये २०१४ ते २०१७ या काळात विक्री आणि विपणन विभागाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.

TVS Motor Company बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • मुख्यालयाचे ठिकाण: चेन्नई, तामिळनाडू येथे TVS Motor Company चे मुख्यालय स्थित आहे.
  • वैशिष्ट्य: ही भारतातील तिसरी सर्वात मोठी मोटारसायकल उत्पादक कंपनी असून ती दुचाकी आणि तीन-चाकी वाहनांची एक प्रमुख जागतिक उत्पादक आहे.