ब्रिटिश मासिक 'टाइम्स हायर एज्युकेशन (Times Higher Education - THE)' च्या जागतिक क्रमवारी २०२७ मध्ये 'भारतीय विज्ञान संस्था (Indian Institute of Science - IISc)', बेंगळुरू ही सर्वोच्च मानांकन असलेली भारतीय संस्था ठरली आहे.
ठळक मुद्दे:
- सदर यादीत ऑक्सफर्ड विद्यापीठाचे सलग ११ व्या वर्षी अव्वल स्थान कायम राहिले आहे.
- केप टाउन, दक्षिण आफ्रिका येथील 'केप टाउन विद्यापीठ' येथे आयोजित 'वर्ल्ड ॲकॅडेमिक समिट'मध्ये, ब्रिटिश मासिक 'टाइम्स हायर एज्युकेशन' ने आपली 'जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२७' जाहीर केली.
- यातील ताज्या क्रमवारीनुसार 'भारतीय विज्ञान संस्था (Indian Institute of Science - IISc)', बेंगळुरू ही सर्वोच्च मानांकन असलेली भारतीय संस्था ठरली आहे.
- IISc ने ५७ च्या एकूण गुणांसह जागतिक स्तरावर २५४ वे स्थान मिळवले आहे.
जागतिक क्रमवारी:
- १. ऑक्सफर्ड विद्यापीठ - युनायटेड किंगडम
- २. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT)' - युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA)
- ३. प्रिन्स्टन विद्यापीठ (USA) आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठ (USA)
- ५. केंब्रिज विद्यापीठ, UK
- ६. हार्वर्ड विद्यापीठ, USA