नुकतीच 'भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राचे (Indian National Centre for Ocean Information Services - INCOIS)' संचालक डॉ. टी. एम. बालकृष्णन नायर यांची युनेस्कोच्या (United Nations Educational, Scientific and Cultural Organization - UNESCO) 'आंतरशासकीय समुद्रविज्ञान आयोग (Intergovernmental Oceanographic Commission - IOC)' अंतर्गत असलेल्या 'इंडियन ओशन' उप-आयोगाच्या (IOCINDIO) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • सदर निवड ही इंडोनेशियातील बाली येथे १२ ते १४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित दुसऱ्या आंतरशासकीय सत्रात करण्यात आली आहे.
  • डॉ. नायर हे समुद्रशास्त्रीय संशोधन, कार्यात्मक समुद्रशास्त्र, सागरी माहिती सेवा आणि शाश्वत सागरी संसाधन व्यवस्थापन या क्षेत्रांतील प्रादेशिक सहकार्याचे नेतृत्व करतील.

डॉ. नायर यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • ते INCOIS चे संस्थापक सदस्य असून त्यांना जवळपास ३० वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे.
  • कुवेतचे तुर्की अल-सैद आणि मॉरिशसचे बादल मोहम्मद रेझा यांची IOCINDIO च्या उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे.