नुकताच स्वच्छता आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी 'स्वच्छता ही सेवा (Swachhata Hi Seva) २०२६' मोहिमेचा नवी दिल्ली येथे वृक्षारोपण करून देशभरात शुभारंभ करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे:
- इंडिया गेट, नवी दिल्ली येथील चिल्ड्रन्स पार्कमध्ये 'एक पेड माँ के नाम (आईच्या नावाने एक झाड)' उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करून सदर मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.
- गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि जलशक्ती मंत्रालयांतर्गत येणाऱ्या पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या संयुक्त विद्यमाने 'स्वच्छता ही सेवा (SHS) २०२६' या देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
- १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ही मोहीम राबवण्यात येईल आणि गांधी जयंती (२ ऑक्टोबर) दिवशी तिचा समारोप करण्यात येईल.
'स्वच्छता ही सेवा २०२६' बाबत महत्वपूर्ण माहिती:
- 'स्वच्छता ही सेवा २०२५' या मागील आवृत्तीमध्ये सुमारे १८ कोटी (ग्रामीण - १३.९१ कोटी आणि शहरी - ४.५३ कोटी) लोकांनी आपला सहभाग नोंदवला होता.
- संकल्पना /थीम (Theme): 'स्वच्छतेत सहभाग; स्वच्छ भारत, विकसित भारत (Swachhata Mein Sahbhag; Swachh Bharat, Viksit Bharat)' ही या मोहिमेची संकल्पना आहे.