नुकतेच प्रसार भारतीचे माजी अध्यक्ष सूर्य प्रकाश यांच्यामार्फत ज्येष्ठ प्रसारक आणि दूरदर्शनच्या माजी निर्मात्या हरसरन बीर कौर पांडे यांनी लिहीलेल्या 'द इव्होल्यूशन ऑफ टीव्ही न्यूज इन इंडिया: फ्रॉम दूरदर्शन टू डिजिटल डिस्रप्शन – ॲन इनसाइडर्स अकाउंट (The Evolution of TV News in India: From Doordarshan to Digital Disruption – An Insider’s Account)' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- या पुस्तकाचे प्रकाशन नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटर (India International Centre - IIC) येथे करण्यात आले आहे.
- सदर पुस्तक हे ‘ओम बुक्स इंटरनॅशनल (Om Books International)' द्वारे प्रकाशित करण्यात आले आहे.
- भारतीय दूरदर्शन पत्रकारितेच्या सुमारे ५ दशकांचा प्रवास या पुस्तकात मांडण्यात आला आहे.
- यात अगदी दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळापासून डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मपर्यंतच्या उत्क्रांतीचा आढावा घेण्यात आला आहे.