नुकतेच सुनील गावस्कर यांच्या हस्ते संजय जगदाळे यांच्या क्रिकेट प्रवासावर आधारित ‘रग रग में क्रिकेट (Rag Rag Mein Cricket)’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • भारताचे माजी क्रिकेट कर्णधार सुनील गावस्कर यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील इंदूर येथे ‘संजय जगदाळे: रग-रग में क्रिकेट (Sanjay Jagdale: Rag-Rag Mein Cricket)’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.
  • सदर पुस्तकाचे लेखन किरण वायकर आणि सुनील दुधाळे यांनी केले आहे.
  • माजी क्रिकेटपटू, निवड समिती सदस्य तसेच प्रशासक संजय जगदाळे यांचे जीवन आणि क्रिकेटमधील प्रवासाचा आढावा हे पुस्तक घेते.

BCCI बाबत महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): BCCI म्हणजेच Board of Control for Cricket in India अर्थात 'भारतीय क्रिकेट नियामक मंडळ' होय.
  • वैशिष्ट्य: BCCI ही भारतातील क्रिकेटचे नियमन करणारी राष्ट्रीय संस्था म्हणून कार्यरत आहे.
  • स्थापना वर्ष: १९२८ मध्ये BCCI ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: क्रिकेट सेंटर, वानखेडे स्टेडियम (चर्चगेट, मुंबई, महाराष्ट्र) येथे BCCI चे मुख्यालय स्थित आहे.
  • सध्या कार्यरत अध्यक्ष: सध्या मिथुन मन्हास हे BCCI च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
  • पुरुष संघ प्रशिक्षक: गौतम गंभीर हे सध्या पुरुष संघाचे प्रशिक्षक पद सांभाळत आहेत.
  • महिला संघ प्रशिक्षक: अमोल मुजुमदार महिला संघाचे प्रशिक्षक पद सांभाळत आहेत.