नुकताच भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री 'फिफा प्लेयर इम्पॅक्ट प्रोग्राम (FIFA Player Impact Programme)' २०२६ मध्ये सहभागी होणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे.

ठळक मुद्दे:

  • भारतीय पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार सुनील छेत्री 'फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (Fédération Internationale de Football Association - FIFA)' च्या 'प्लेअर इम्पॅक्ट प्रोग्राम'च्या दुसऱ्या आवृत्तीत सहभागी होणारा पहिला पुरुष खेळाडू बनला आहे असे 'अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (All India Football Federation - AIFF)' जाहीर केले आहे.
  • १४ महिला फुटबॉलपटूंसह २०२५ मध्ये सुरू झालेला हा कार्यक्रम २०२६ मध्ये विस्तारला असून यात आता १३ सहभागी (१२ महिला आणि १ पुरुष - सुनील छेत्री) आहेत.
  • सामाजिक बदल घडवून आणणे हा या कार्यक्रमाचा सकारात्मक उद्देश आहे.