आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महिला एकेरी आणि पुरुष एकेरी स्क्वॅश प्रकारात अनुक्रमे अनाहत सिंग आणि अभय सिंग यांनी रौप्य पदक जिंकले आहे.
ठळक मुद्दे
- जपानमधील आइची-नागोया येथील आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये स्क्वॅश एकेरी प्रकारात भारताने २ रौप्य पदके जिंकली आहेत.
- अनाहत सिंग ही स्क्वॅशच्या एकेरी प्रकारात रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली तर अभय सिंगने या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.
- महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटांतील अंतिम सामन्यांत या दोघांनाही मलेशियाच्या गतविजेत्या खेळाडूंकडून पराभव स्वीकारावा लागला.
- शिवसंगरी सुब्रमण्यम हिच्याकडून अनाहतचा तर एनजी ईन यो याच्याकडून अभयचा पराभव झाला.
- हे सामने जिंकल्यामुळे मलेशियन खेळाडूंना आवश्यक पात्रता निकषांसह 'एलए २०२८ ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवण्याची संधीही मिळाली आहे.
- भारताच्या जोशना चिनप्पा आणि वेलवन सेंथिलकुमार या जोडीने मिश्र दुहेरी प्रकारात कांस्य पदक जिंकले आहे.
विजेत्यांची यादी:
महिला एकेरी:
- १. शिवसंगरी सुब्रमण्यम (मलेशिया)
- २. अनाहत सिंग (भारत)
पुरुष एकेरी:
- १. एनजी ईन यो (मलेशिया)
- २. अभय सिंग (भारत)