स्क्वाड्रन लीडर भावना कंठ या भारतीय वायुसेनेच्या (Indian Air Force - IAF) पहिल्या महिला लढाऊ विमान युद्ध-संचालक (Fighter Combat Leader) बनल्या आहेत.
ठळक मुद्दे:
- ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील 'टॅक्टिक्स अँड एअर कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट' (Tactics and Air Combat Development Establishment - TACDE) मध्ये प्रतिष्ठित असा 'फायटर कॉम्बॅट लीडर' (Fighter Combat Leader - FCL) अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करत स्क्वाड्रन लीडर भावना कंठ या भारतीय वायुसेनेच्या (IAF) अशा पहिल्या महिला फायटर पायलट ठरल्या आहेत.
- आपल्या या कामगिरीमुळे त्या IAF च्या अत्यंत प्रतिष्ठित अशा 'टॉप गन (Top Gun)' स्कूलच्या पहिल्या महिला पदवीधर ठरल्या आहेत ज्यात २० आठवड्यांच्या प्रगत लढाऊ कार्यक्रमासाठी IAF मधील केवळ १% वैमानिकांची निवड करण्यात येते.
स्क्वाड्रन लीडर भावना कंठ यांच्याबद्दल थोडक्यात:
- बिहारमधील दरभंगा येथील अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या भावना कंठ यांची जून २०१६ मध्ये भारतीय हवाई दलात नियुक्ती झाली होती.
- मोहना सिंग आणि अवनी चतुर्वेदी यांच्यासोबत त्या भारताच्या पहिल्या तीन महिला लढाऊ वैमानिकांपैकी एक होत्या.
IAF बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full-Form): IAF म्हणजेच Indian Air Force अर्थात भारतीय हवाई दल होय.
- स्थापना वर्ष: ८ ऑक्टोबर १९३२ रोजी IAF ची स्थापना करण्यात आली होती.
- बोधवाक्य (Motto): 'नभः स्पृशं दीप्तम्' (Touch the Sky with Glory) हे भारतीय हवाई दलाचे बोधवाक्य आहे.
- मुख्यालयाचे ठिकाण: IAF मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे.
- सर्वोच्च कमांडर: भारताचे राष्ट्रपती हे भारतीय हवाई दलाचे सर्वोच्च कमांडर असतात.
- सध्याचे वायुसेना प्रमुख: एअर चीफ मार्शल (Air Chief Marshal) अमर प्रीतसिंग हे सध्याचे वायुसेना प्रमुख आहेत.
- वायुसेना दिन साजरा: ८ ऑक्टोबर रोजी वायुसेना दिन साजरा करण्यात येतो.