नुकतीच स्पॅनिश फुटबॉलपटू जुआन माटामार्फत व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- ३८ वर्षीय स्पॅनिश फुटबॉलपटू आणि अटॅकिंग मिडफिल्डर/विंगर जुआन माटा याने व्यावसायिक फुटबॉलमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.
- या निवृत्तीसह त्याच्या २ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा समारोप झाला आहे.
- स्पेनचे प्रतिनिधित्व करताना त्याने ४१ आंतरराष्ट्रीय सामन्यांत १० गोल केले.
- त्याने २०१० चा 'फिफा (FIFA) विश्वचषक' आणि २०१२ ची 'यूईएफए युरोपियन चॅम्पियनशिप' देखील जिंकली आहे.
- आता तो 'मेलबर्न व्हिक्टरी (Melbourne Victory)' क्लबमध्ये भागधारक तसेच त्यांच्या फुटबॉल समितीचा प्रमुख म्हणून फुटबॉल प्रशासनाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे.