नुकतीच सोमनाथ पणिक्कर यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India - RBI) केंद्रीय मंडळावर अर्धवेळ संचालक म्हणून नियुक्ती तर आनंद महिंद्रा यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- भारत सरकारमार्फत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (Indian Space Research Organisation - ISRO) माजी अध्यक्ष सोमनाथ पणिक्कर यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) केंद्रीय मंडळावर अर्धवेळ, गैर-अधिकृत संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- सदर नियुक्ती ही २० ऑगस्ट २०२६ पासून ४ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
- महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांचीही याच पदावर फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
सोमनाथ पणिक्कर यांच्याबद्दल थोडक्यात:
- १५ जानेवारी २०२२ ते १४ जानेवारी २०२५ या कालावधीत त्यांनी इस्रोचे १० वे अध्यक्ष आणि 'अंतराळ विभागाचे सचिव (Secretary of the Department of Space)' म्हणून काम पाहिले आहे.
- २३ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांच्या कार्यकाळात इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ 'चांद्रयान-३' चे यशस्वी 'सॉफ्ट लँडिंग' साध्य केले.
RBI बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात 'भारतीय रिझर्व्ह बँक' होय.
- स्थापना वर्ष: RBI कायदा, १९३४ अंतर्गत १ एप्रिल १९३५ रोजी RBI ची स्थापना करण्यात आली होती.
- बँक राष्ट्रीयीकरण वर्ष: १ जानेवारी १९४९ रोजी RBI राष्ट्रीयीकृत करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI चे मुख्यालय स्थित आहे.
- सध्या कार्यरत गव्हर्नर: सध्या संजय मल्होत्रा हे RBI च्या गव्हर्नर पदावर कार्यरत आहेत.