नुकतीच स्मृती मानधना महिला T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनली आहे.
ठळक मुद्दे:
- आशियाई खेळ २०२६ मधील उपांत्य सामन्यादरम्यान स्मृती मानधनाने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
- स्मृतीने आपल्या ४,७८८ धावांसह सुझी बेट्सला मागे टाकत महिला T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूचा मान मिळवून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे.
- स्मृतीने या सामन्यात १९४.४७ च्या स्ट्राईक रेटने केवळ १९ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३७ धावा बनवल्या.
- महिला T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ४,२८७ धावांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.
- यासोबतच स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १०९६६ धावा करताना भारताची माजी कर्णधार मिताली राजला (१०८६८ धावा) मागे टाकले आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला खेळाडू (खेळाडू - देश - धावा):
- १. स्मृती मानधना (भारत - ४,७८८ धावा)
- २. सुझी बेट्स (न्यूझीलंड - ४,७५८ धावा)
- ३. हरमनप्रीत कौर (भारत - ४,२८७ धावा)
- ४. चमारी अथापथु (श्रीलंका - ४,२८२ धावा)
- ५. सोफी डिव्हाईन (न्यूझीलंड - ३,८१७ धावा)
क्रिकेटमधील प्रत्येक प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला खेळाडू यादी (प्रकार- खेळाडू - देश-सर्वाधिक धावा):
- १. कसोटी (Tests): जॅन ब्रिटिन - इंग्लंड (१९३५ धावा)
- २. एकदिवसीय (ODIs): मिताली राज - भारत (७८०५ धावा)
- ३. T20I: स्मृती मानधना - भारत (४७८८ धावा)
- ४. सर्व प्रकारांत मिळून: स्मृती मानधना - भारत (१०९६६ धावा)