'स्कायट्रॅक्स जागतिक एअरलाइन पुरस्कार (Skytrax World Airline Awards)' २०२६ मध्ये 'सिंगापूर एअरलाइन्स (Singapore Airlines)' ही जगातील सर्वोत्तम एअरलाइन ठरली आहे.
ठळक मुद्दे:
- भारतीय एअरलाइन्समध्ये सदर यादीत 'एअर इंडिया' अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे.
- आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक मानांकन संस्था 'स्कायट्रॅक्समार्फत (Skytrax)' सदर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
- लंडन, युनायटेड किंगडम येथे आयोजित एका समारंभात ही घोषणा करण्यात आली आहे.
- २०२५ च्या तुलनेत तिने २७ स्थानांची सुधारणा करत एअर इंडियाने जागतिक स्तरावर ५७ वे स्थान मिळवले आहे.
- एअर इंडिया ही सर्वोच्च मानांकन असलेली भारतीय एअरलाइन ठरली असून भारत आणि दक्षिण आशिया प्रादेशिक यादीत अव्वल स्थानी विराजमान झाली आहे.
- इंडिगो (IndiGo) ही जागतिक स्तरावर ६१ व्या स्थानावर असून ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम भारतीय एअरलाइन ठरली.
जागतिक स्तरावरील अव्वल स्थानावरील क्रमवारी:
- १. सिंगापूर एअरलाइन्स
- २. कतार एअरवेज (कतार)
- ३. कॅथे पॅसिफिक एअरवेज (हाँगकाँग)
- ४. एएनए ऑल निप्पॉन एअरवेज (जपान)
- ५. टर्किश एअरलाइन्स (तुर्की)
भारतीय एअरलाईन्सची जागतिक क्रमवारी:
- ५७. एअर इंडिया
- ६१. इंडिगो
वर्ल्ड एअरलाइन अवॉर्ड्सबाबत महत्वपूर्ण माहिती:
- 'विमान वाहतूक क्षेत्रातील ऑस्कर (Oscars of the aviation industry)' मानले जाणारे हे पुरस्कार १९९९ मध्ये सुरू झाले होते.
- पूर्णपणे स्वतंत्र, निष्पक्ष आणि कोणत्याही प्रायोजकत्वाचा सहभाग नसणारे असे हे पुरस्कार आहेत.