नुकतीच केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यामार्फत कोंबड्यांसाठी भारतातील पहिली स्वदेशी 'इनॲक्टिव्हेटेड' (निष्क्रिय) H5N1 बर्ड फ्लू लस राष्ट्राला समर्पित करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • भोपाळ, मध्य प्रदेश येथील 'इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीजेस' (ICAR–NIHSAD) येथे श्री. शिवराज सिंह चौहान (केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री तसेच ग्रामीण विकास मंत्री) यांनी कोंबड्यांसाठी भारतातील पहिली स्वदेशी विकसित 'इनॲक्टिव्हेटेड' H5N1 (क्लेड २.३.२.१a) 'हायली पॅथोजेनिक एव्हियन इन्फ्लूएंझा' (HPAI) लस राष्ट्राला समर्पित केली आहे.
  • यासह त्यांनी ICAR-NIHSAD, भोपाळ येथे सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक 'बायोसेफ्टी लेव्हल-४' (BSL-4) प्रयोगशाळा उभारण्याची घोषणादेखील केली आहे.