नुकतेच अहमदाबाद येथे झालेल्या 'वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीजमध्ये (World Archery Para Series)' भारताच्या शीतल देवीने पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले आहे.
ठळक मुद्दे:
- कझाकस्तानच्या आयझाडा सेइडनचा 'कम्पाऊंड महिला' गटात 'शूट-ऑफ'मध्ये पराभव करून भारताच्या शीतल देवीने हे पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले आहे.
- '२०२६ आयची-नागोया आशियाई पॅरा गेम्सपूर्वी (Aichi-Nagoya Asian Para Games)' शीतल देवीने मिळविलेला हा विजय तिच्या भावी कारकिर्दीत महत्त्वाचा अनुभव ठरेल यांत शंकाच नाही.
- शूट-ऑफमध्ये शीतल देवीने उत्कृष्ट खेळ करत या सिरीजमधील पहिले सुवर्णपदक जिंकले आहे.
- आयझाडा सेइडनसाठी हे कारकिर्दीतील पहिले रौप्यपदक ठरले आहे.