शांतनु मोईत्रा यांना नुकताच मध्य प्रदेश सरकारतर्फे इंदूरमध्ये 'राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार (National Lata Mangeshkar Award) २०२६' प्रदान करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे:

  • संगीतकार शांतनु मोईत्रा यांना २८ सप्टेंबर महान गायिका लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या संगीत दिग्दर्शनातील योगदानाबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे इंदूरमध्ये 'राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार २०२६' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
  • ५ लाख रुपयांची करमुक्त रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

शांतनु मोईत्रा यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • २२ जानेवारी १९६८ रोजी लखनौ येथे त्यांचा जन्म झाला होता. 
  • त्यांनी जाहिरात क्षेत्रात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.
  • 'परिणीता', 'हजारों ख्वाहिशें ऐसी', 'लगे रहो मुन्ना भाई', '३ इडियट्स', 'मद्रास कॅफे', 'पिकू', 'ऑक्टोबर' आणि '१२ वी फेल' यांचा त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांमध्ये  समावेश होतो.
  • 'ना बंगारू तल्ली' या तेलगू चित्रपटासाठी २०१४ मध्ये शांतनु मोईत्रा यांना सर्वोत्तम संगीत दिग्दर्शनाचा (पार्श्वसंगीत) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.