एअर व्हाइस मार्शल शक्ती शर्मा भारतीय संरक्षण दलातील वैद्यकीय क्षेत्राबाहेरील (Non-medical) विभागातील पहिल्या महिला 'टू-स्टार' अधिकारी बनल्या आहेत.
ठळक मुद्दे:
- भारतीय संरक्षण दलाच्या वैद्यकीय क्षेत्राबाहेरील (Non-medical) विभागातून AVM किंवा त्यास समकक्ष पद प्राप्त करत एअर व्हाइस मार्शल (Air Vice Marshal - AVM) शक्ती शर्मा यांनी पहिल्या महिला अधिकारी बनण्याचा मान मिळवत इतिहास घडवला आहे.
- नवी दिल्ली येथील हवाई मुख्यालय येथे त्यांनी 'सहाय्यक हवाई दल प्रमुख (शिक्षण)' या पदाचा कार्यभार स्वीकारत शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्रात महत्त्वाची नेतृत्व भूमिका हाती घेतली.
एअर व्हाइस मार्शल शक्ती शर्मा यांच्याबद्दल थोडक्यात माहिती:
- १८ जून १९९४ रोजी भारतीय हवाई दलाच्या शिक्षण विभागात त्या नियुक्त झाल्या होत्या.
- प्रशिक्षण संस्था, कमांड मुख्यालये आणि हवाई मुख्यालय अशा विविध ठिकाणी त्यांनी ३० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली आहे.
- त्यांनी IIT कानपूर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे 'IAF चेअर्स ऑफ एक्सलन्स' स्थापन करण्याच्या उपक्रमांचे नेतृत्व केले.
- पंजाबमधील कपूरथळा येथील सैनिक शाळेचे नेतृत्व करणाऱ्या त्या तिन्ही संरक्षण दलांमधील (Tri-Services) पहिल्या महिला ठरल्या.
IAF बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full-Form): IAF म्हणजेच Indian Air Force अर्थात भारतीय हवाई दल होय.
- स्थापना वर्ष: ८ ऑक्टोबर १९३२ रोजी IAF ची स्थापना करण्यात आली होती.
- बोधवाक्य (Motto): 'नभः स्पृशं दीप्तम्' (Touch the Sky with Glory) हे भारतीय हवाई दलाचे बोधवाक्य आहे.
- मुख्यालयाचे ठिकाण: IAF मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे.
- सर्वोच्च कमांडर: भारताचे राष्ट्रपती हे भारतीय हवाई दलाचे सर्वोच्च कमांडर असतात.
- सध्याचे वायुसेना प्रमुख: एअर चीफ मार्शल (Air Chief Marshal) अमर प्रीतसिंग हे सध्याचे वायुसेना प्रमुख आहेत.
- वायुसेना दिन साजरा: ८ ऑक्टोबर रोजी वायुसेना दिन साजरा करण्यात येतो.