शबनम सिन्हा यांची नुकतीच एयरटेल पेमेंट बँकेच्या (Airtel Payments Bank) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- १ ऑक्टोबर २०२६ पासून ३ वर्षांच्या कार्यकाळासाठी शबनम सिन्हा यांची एअरटेल पेमेंट्स बँक लिमिटेडच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
- भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) बँकिंग नियमन कायदा, १९४९ अंतर्गत अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतर सदर नियुक्ती करण्यात आली आहे.
- त्या सुनील भारती मित्तल यांची जागा घेतील.
- भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री. मित्तल यांची २०१९ मध्ये अकार्यकारी अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
शबनम सिन्हा यांच्याबद्दल महत्वपूर्ण माहिती:
- त्यांच्याकडे ३ दशकांहून अधिक काळाचा विकास वित्त, वित्तीय सेवा, सार्वजनिक धोरण आणि संस्थात्मक परिवर्तन या क्षेत्रांत उल्लेखनीय नेतृत्व तसेच संचालक मंडळावरील कामाचा अनुभव आहे.
- एअरटेल पेमेंट्स बँकेच्या संचालक मंडळात त्या सध्या 'स्वतंत्र संचालक' म्हणून कार्यरत आहेत.
- त्या 'फसवणूक प्रकरणांवर देखरेख करणाऱ्या विशेष समितीच्या (Special Committee for Monitoring Frauds)' अध्यक्षपदावर असून 'जोखीम व्यवस्थापन समिती (Risk Management Committee)' आणि 'माहिती तंत्रज्ञान (Information Technology - IT) समिती'च्या सदस्य देखील आहेत.
एयरटेल पेमेंट बँक (Airtel Payments Bank) बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- स्थापना वर्ष: भारती एयरटेल (Bharti Airtel) ही पालक कंपनी असणाऱ्या एयरटेल पेमेंट बँकेची (Airtel Payments Bank) भारतातील पहिली पेमेंट्स बँक म्हणून ११ एप्रिल २०१६ रोजी स्थापना करण्यात आली होती.
- मुख्यालय: नवी दिल्ली येथे एयरटेल पेमेंट बँकेचे मुख्यालय स्थित आहे.
- बँकेचे नियमन: भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत या बँकेचे नियमन करण्यात येते.