पद्मश्री सेतुरामन पंचनाथन हे नुकतेच 'राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमी (National Academy of Engineering - NAE)' चा 'आर्थर एम. ब्युचे पुरस्कार (Arthur M. Bueche Award) २०२६' जिंकणारे पहिले भारतीय-अमेरिकन ठरले आहे.

ठळक मुद्दे:

  • 'राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमीमार्फत (National Academy of Engineering - NAE)' भारतीय वंशाचे संगणक शास्त्रज्ञ सेतुरामन पंचनाथन यांची 'आर्थर एम. ब्युचे पुरस्कार २०२६' साठी निवड करण्यात आली आहे.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरणाला चालना दिल्याबद्दल सदर पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
  • सदर पुरस्काराच्या ४० वर्षांहून अधिक काळाच्या इतिहासात हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय-अमेरिकन व्यक्ती ठरले आहेत.
  • विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारकडून २०२५ मध्ये त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

NAE च्या 'आर्थर एम. ब्युचे पुरस्कारा'बाबत महत्वपूर्ण माहिती:

  • स्थापना वर्ष: १९८२ मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती.
  • पुरस्कार वैशिष्ट्य: हा एक सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान आहे जो विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांचा गौरव करतो.
  • सर्वप्रथम पुरस्कार वितरण: १९८३ मध्ये हा पुरस्कार सर्वप्रथम प्रदान करण्यात आला होता. 
  • प्रथम पुरस्कार विजेते: सायमन रामो (दिग्गज एरोस्पेस अभियंता आणि उद्योजक) यांना पहिल्यांदा हा पुरस्कार वितरित करण्यात आला होता.
  • पुरस्कार नामांतरण: आर्थर एम. ब्युचे (१९२०-१९८१) यांच्या नावावरून या पुरस्काराचे नाव ठेवण्यात आले होते.
  • पुरस्कार स्वरूप: यामध्ये १ स्मृती पदक आणि हस्तलिखित प्रमाणपत्र देण्यात येऊन
  • पुरस्कार वितरण: सदर पुरस्कार हा दरवर्षी वॉशिंग्टन, डी.सी. (अमेरिका) येथे होणाऱ्या NAE च्या वार्षिक बैठकीत (शक्यतो ऑक्टोबर महिन्यात) प्रदान करण्यात येतो.