सावन बरवालने नागोया येथे आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये दैदीप्यमान कामगिरी बजावताना रौप्य पदक जिंकले आहे.

ठळक मुद्दे:

  • बरवालने २:११:३७ अशी राष्ट्रीय विक्रमी वेळ नोंदवत या प्रकारातील भारताचा ४४ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला आहे.
  • जपानच्या इचिताका यामाशिताने २:१०:४९ वेळेसह सुवर्णपदक तर २:११:३७ वेळ नोंदवत बरवालने रौप्य पदक आपल्या नावे केले.
  • बरवालने एक नवीन राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला आहे.
  • पुरुषांच्या मॅरेथॉन स्पर्धेत बरवाल आणि कार्तिक कारकेरा या भारतीय धावपटूंचा सहभाग होता.

विजेत्यांची यादी:

  • १. इचिताका यामाशिता (जपान) - सुवर्ण पदक
  • २. सावन बरवाल (भारत) - रौप्य पदक

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदक कामगिरी:

  • १. छोटा सिंग (नवी दिल्ली, १९५१) - सुवर्ण पदक
  • २. सुरत सिंग माथूर (नवी दिल्ली, १९५१) - कांस्य पदक
  • ३. होसूर कुक्कप्पा सीतारन (नवी दिल्ली, १९८२) - कांस्य पदक
  • ४. सावन बारवाल (आयची-नागोया, २०२६) - रौप्य पदक