सविता पुनिया नुकतीच भारताची सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली महिला हॉकीपटू ठरली आहे.

ठळक मुद्दे:

  • वंदना कटारिया चा ३२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा विक्रम मागे टाकत सविता पुनिया (३२१ आंतरराष्ट्रीय सामने) भारताची सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली महिला हॉकीपटू बनण्याचा मान मिळविला आहे.
  • ३६ वर्षीय सविताच्या या विक्रमाची दखल घेत 'हॉकी इंडिया'मार्फत तिला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
  • 'हॉकी इंडिया'चे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी तिच्या दीर्घ कारकिर्दीचे तसेच नेतृत्वगुणांचे खूप कौतुक केले.
  • जपानमधील (आयची-नागोया) आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ दरम्यान भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील 'पूल बी' सामन्यात सविताने हा विक्रम प्रस्थापित केला आहे. 
  • सविताने वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्तरावर २००९ मध्ये पदार्पण केले होते.
  • भारतासाठी तिने ३ ऑलिम्पिक आणि २ आशियाई क्रीडा स्पर्धांसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला आहे.