नुकतेच केंद्रीय मंत्री श्री. सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते दिल्ली येथील पहिल्या मनोरंजनात्मक यमुना नदी क्रूझ सेवेचे उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- श्री. सर्बानंद सोनोवाल (केंद्रीय मंत्री, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय) यांनी नवी दिल्लीतील सोनिया विहार येथे यमुना नदीवरील दिल्लीच्या पहिल्या मनोरंजनात्मक क्रूझ सेवेचे उद्घाटन केले आहे.
- दिल्लीचे नायब राज्यपाल सरदार तरणजित सिंग संधू आणि मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी याप्रसंगी आपली उपस्थिती दर्शविली.