नुकतेच पी.पी. चौधरी यांना 'संसद रत्न पुरस्कार (Sansad Ratna Awards) २०२६' साठी चौथ्यांदा सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • नवी दिल्ली येथे १६ वा संसद रत्न पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
  • संसदीय कामगिरीसाठी सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या संसद सदस्य आणि संसदीय स्थायी समिती सदस्यांची काही विशेष उपलब्ध निर्देशकांवर आधारित दखल घेण्यात आली.
  • पाली लोकसभा खासदार आणि वन नेशन, वन इलेक्शन (One Nation, One Election - ONOE) या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष असणाऱ्या पी.पी. चौधरी यांना चौथ्यांदा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

'संसद रत्न पुरस्कार २०२६' बाबत महत्वपूर्ण माहिती:

  • यामध्ये समाविष्ट पुरस्कारांमध्ये १० लोकसभा खासदार, २ राज्यसभा खासदार आणि ४ संसदीय स्थायी समित्या आणि डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम जनसेवा पुरस्कार इ. बाबींचा समावेश आहे.

मूल्यमापन निकष - समाविष्ट बाबी:

  • सभागृह उपस्थिती
  • सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांची संख्या
  • वादविवादात सहभाग
  • संसदेतील एकूण विधायी योगदान
  • खाजगी सदस्य विधेयके

लोकसभा पुरस्कार विजेते २०२६:

  • पी.पी. चौधरी
  • जगदंबिका पाल
  • निशिकांत दुबे
  • डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे

राज्यसभा पुरस्कार विजेते २०२६:

  • डॉ.मेधा विश्राम कुलकर्णी
  • नरहरी अमीन