नुकताच सांकू हा लडाखचा ८ वा जिल्हा बनला असून त्यासाठी स्वतंत्र हिल कौन्सिलची स्थापना करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • १६ ऑक्टोबर २०२६ रोजी, लडाख केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल (LG) विनय कुमार सक्सेना यांनी कारगिल जिल्ह्यातून वेगळे करून 'सांकू'ला लडाखचा ८ वा जिल्हा म्हणून घोषित केले. तसेच, स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक सेवा वितरण अधिक बळकट करण्यासाठी, 'लडाख स्वायत्त हिल विकास परिषद' (LAHDC) स्थापन करण्याची अधिसूचना जारी केली.

'सांकू' बाबत महत्वपूर्ण माहिती:

  • सांकू हे या जिल्ह्याचे मुख्यालय असेल.
  • 'LAHDC कायदा, १९९७' अंतर्गत या जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र 'लडाख स्वायत्त हिल विकास परिषद' गठित करण्यात आली आहे.
  • सांकू जिल्ह्याच्या निर्मितीमुळे प्रशासनाचे विकेंद्रीकरण करण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.