नुकतेच संजय सिंघाल यांच्याकडे 'इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (Indo-Tibetan Border Police - ITBP)' चा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला असून एअर मार्शल विक्रम गौर यांची 'डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स(Department of Military Affairs - DMA)' मध्ये अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • केंद्रीय गृह मंत्रालयाने सशस्त्र सीमा दलाचे (Sashastra Seema Bal - SSB) महासंचालक संजय सिंघाल यांच्याकडे इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) च्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.
  • यासोबतच एअर मार्शल विक्रम गौर हे संरक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या 'डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्समध्ये' अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेले भारतीय हवाई दलाचे (Indian Air Force  - IAF) पहिले अधिकारी ठरले आहेत.
  • श्री. संजय सिंघाल हे १९९३ च्या बॅचचे उत्तर प्रदेश केडरचे भारतीय पोलीस सेवा (Indian Police Service - IPS) अधिकारी आहेत.
  • ते १९९० च्या बॅचचे हरियाणा केडरचे IPSअधिकारी श्री. शत्रुजीत सिंग कपूर यांची जागा घेतील.