नुकतेच केंद्रीय राज्यमंत्री संजय सेठ यांच्यामार्फत नवी दिल्ली येथील मानेकशॉ सेंटर येथे ‘विश्व (VISV: Vision, Innovation, Synergy, Values ​​- दृष्टी, नाविन्य, समन्वय, मूल्ये) २०२६' चे उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • श्री. संजय सेठ (केंद्रीय राज्यमंत्री, संरक्षण मंत्रालय) यांनी नवी दिल्ली येथे ‘विश्व’ चे उद्घाटन केले आहे. 
  • कार्यक्रमाची संकल्पना: 'संरक्षण क्षमतांचे प्रदर्शन, जागतिक भागीदारी बळकट करणे (Showcasing Defence Capabilities, Strengthening Global Partnerships)' ही या कार्यक्रमाची संकल्पना होती.
  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमार्फत (Defence Research and Development Organisation - DRDO) ‘सेंटर फॉर जॉइंट वॉरफेअर स्टडीज (Centre for Joint Warfare Studies - CENJOWS)' च्या भागीदारीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
  • याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री संजय सेठ यांनी DRDO च्या उत्पादनांची माहिती देणारा एक संग्रह अरबी, स्पॅनिश आणि फ्रेंच भाषांमध्ये प्रकाशित केला.
  • आंतरराष्ट्रीय भागीदारांमध्ये भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाचा प्रसार करणे हा याचा मुख्य उद्देश आहे.