नुकतेच सॅमसंग सेमीकंडक्टर इंडिया रिसर्च (Samsung Semiconductor India Research) आणि 'भारतीय विज्ञान संस्था (Indian Institute of Science - IISc)' यांच्या संयुक्त विद्यमाने बंगळूरु येथे क्वांटम संशोधन प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- क्वांटम तंत्रज्ञान संशोधन तसेच विकासामध्ये उद्योग-शैक्षणिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी या क्वांटम संशोधन प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले आहे.
- ही प्रयोगशाळा विविध क्वांटम उपकरणांवर लक्ष केंद्रित करणार आहे.