सागरमाला फायनान्स (Sagarmala Finance) भारताचा पहिला 'ब्लू बाँड (Blue Bond)' जारी करणार आहे.
ठळक मुद्दे:
- सागरी आणि शाश्वत पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी सदर १०-वर्षीय बाँड्सद्वारे ६०० कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
- याद्वारे भारतात पहिल्यांदाच 'ब्लू बाँड'ची निर्मिती केली जाणार आहे.
- या निधीचा वापर सागरी क्षेत्रातील प्रकल्पांसाठी ज्यामध्ये नवीन बंदरांच्या सुविधा (ग्रीनफील्ड पोर्ट्स) आणि किनारपट्टीवरील रस्ते जाळ्यांचा समावेश आहे त्यासाठी केला जाणार आहे.
'ब्लू बाँड्स' बाबत महत्वपूर्ण माहिती:
- 'ब्लू बाँड्स' ही एक अर्थ शास्त्रीय संकल्पना असून ती आर्थिक साधने आहेत.
- सागरी आणि जलसंपत्तीची शाश्वतता व जतन यांच्याशी संबंधित उपक्रमांसाठी निधी उभारणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो.