भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात SEBI मार्फत 'प्रोजेक्ट जागरूक (Project Jagrook)' अंतर्गत 'समज से इन्व्हेस्टिंग सिंपल (Samajh Se Investing Simple)' ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- SEBI ने पंजाबमधील चंदीगड येथील पंजाब विद्यापीठात 'प्रोजेक्ट जागरूक' अंतर्गत 'समज से इन्व्हेस्टिंग सिंपल' ही मोहीम सुरू केली आहे.
- गुंतवणूक प्रक्रिया सुलभ करणे तसेच आर्थिक फसवणुकीपासून गुंतवणूकदारांचे संरक्षण बळकट करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
SEBI बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): SEBI म्हणजेच Securities and Exchange Board of India अर्थात 'भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ' होय.
- स्थापना वर्ष: १२ एप्रिल १९८८ रोजी एक बिगर-वैधानिक संस्था म्हणून स्थापना.
- वैधानिक दर्जा प्राप्त वर्ष: ३० जानेवारी १९९२ रोजी 'सेबी कायदा, १९९२' अंतर्गत सेबीला वैधानिक अधिकार प्रदान करण्यात आले.
- मुख्यालयाचे ठिकाण: SEBI चे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे.
- सध्या कार्यरत अध्यक्ष: तुहिन कांत पांडे हे सध्या SEBI च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.