नुकताच 'स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India - SBI)' सलग दुसऱ्या वर्षी 'ग्लोबल फायनान्स' मासिकाचा 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झ्युमर बँक (Global Finance’s World’s Best Consumer Bank) २०२६' पुरस्कार पटकावला आहे.

ठळक मुद्दे:

  • भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असणाऱ्या SBI ने हा पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी जिंकला आहे.
  • यासोबतच बँकेला 'बेस्ट बँक इन इंडिया (Best Bank in India) २०२६' हा पुरस्कारही मिळाला आहे.
  • सदर पुरस्कार बँकॉक, थायलंड येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) २०२६ च्या वार्षिक बैठकीदरम्यान आयोजित 'वर्ल्ड्स बेस्ट बँक अवॉर्ड्स' सोहळ्यात प्रदान करण्यात आले आहेत.

२०२६ सालचे इतर जागतिक विजेते:

  • १. 'बँको सँटांडर' (स्पेन) - 'वर्ल्ड्स बेस्ट बँक' पुरस्कार
  • २. 'डीबीएस बँक' (सिंगापूर) - 'वर्ल्ड्स बेस्ट कॉर्पोरेट बँक' पुरस्कार
  • ३. 'बीबीव्हीए' (स्पेन) - 'वर्ल्ड्स बेस्ट इमर्जिंग मार्केट्स बँक' पुरस्कार
  • ४. 'इकोबँक' (टोगो) - 'वर्ल्ड्स बेस्ट फ्रंटियर मार्केट्स बँक' पुरस्कार